Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

here-is-ghost-trailer-directed-by-vikram-bhat/
मुंबई , मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (12:19 IST)
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ‘हाँटेड’ यांसारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. आता त्यांचा ‘घोस्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा अंगावर रोमांच आणणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
here-is-ghost-trailer-directed-by-vikram-bhat/
दरम्यान, चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी याबाबत सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुनच अंगावर रोमांच उभे राहतात. या चित्रपटाच्या तयारीची सुरुवात २०११ सालीच झाली होती. या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सनाया इरानी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर शिवम भार्गव हा अभिनेताही यामध्ये झळकणार आहे. विक्रम भट्ट स्वत:ही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे