Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिंदी ते मल्याळम पॅन इंडिया अभिनेत्री तमन्ना भाटिया 2023 मध्ये बहुभाषिक प्रोजेक्ट होणार रिलीज!

Webdunia
शुक्रवार, 12 मे 2023 (15:31 IST)
सर्व भाषांमध्ये मनोरंजक  काम करत असताना अभिनेत्री तमन्ना भाटियाचे  २०२३ मध्ये येणार काही खास प्रोजेक्ट  !
तमन्ना भाटिया तिच्या 2023 मधल्या अनेक बहु-भाषिक रिलीजसाठी सज्ज झाली आहे. येत्या वर्षात तिच्याकडे अनेक नवीन प्रोजेक्ट असल्याचं समजतंय.
या सुपर टॅलेंटेड अभिनेत्री तमन्ना भाटियासाठी तिच्या कामा मध्ये भाषा कधीच अडथळा ठरली नाही कारण या पॅन-इंडिया स्टारने सर्व इंडस्ट्री मध्ये काम केले आहे आणि हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने स्वत: ची एक वेगळी ओळख संपादन केली आहे. तिच्या चित्रपटांमध्ये काही दमदार परफॉर्मन्स दिले आहेत. आत्तापर्यंत ७३ हून अधिक चित्रपटांचा भाग राहिल्यानंतर, तमन्नाचे २०२३ मधल्या कामाची लिस्ट खूप काही रोमांचक प्रोजेक्ट ने भरलेली आहे.
 
नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणारी तमन्नाने नेहमीच तिच्या मर्यादां पलिकडे जाऊन भूमिका केल्या. बाहुबली मधील राजकुमारी असो किंवा बबली बाउन्सर मधील महिला बाउंसर असो किंवा प्लॅन ए प्लॅन बी मधील मॅचमेकिंग कंपनीची हेडस्ट्राँग हेड असो, तिने तितकेच स्वतःला पात्र बनवले आहे आणि ते पूर्णत्वास नेले आहे. 2023 मधले तिचे प्रोजेक्ट नक्कीच अफलातून आहेत. तमन्ना आता आपल्याला मल्याळम चित्रपट “बांद्रा” मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे तेलुगुमध्ये "भोला शंकर", तामिळमध्ये "जेलर" हे दोन हिंदी आगामी चित्रपट आहेत. लस्ट स्टोरीजचा दुसरा भाग आणि जी कर्दा देखील येणार आहेत. पण
 
तमन्ना च्या वेगवेगळ्या भूमिका नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहेत यात शंका नाही. वैविध्यपूर्ण आणि मनोरंजक प्रकल्पांचा भाग होण्यासाठी ती खूप उत्साहित आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट 'रेड २' ने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला, ९ व्या दिवशी जबरदस्त कलेक्शन

Border 2: संदेशे आते है गाण्याचे नवीन व्हर्जन तयार,सोनू निगम सोबत हा गायक गाणार गाणे

प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का, कन्नड चित्रपटातून गायकाचे गाणे काढून टाकले

सुनील शेट्टीचा केसरी वीर 16 मे रोजी प्रदर्शित होणार नाही, या दिवशी येणार

अभिनेत्री मलायका अरोरा पासून श्रद्धा कपूर पर्यंत अनेक स्टार्सनी भारतीय सैन्याला सलाम केला

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

Valley of Flowers Uttarakhand येथे अनेक प्रकारची फुले उमलतात

प्रसिद्ध गायक सोनू निगमला उच्च न्यायालयाकडून दिलासा

'धक-धक' गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक

पुढील लेख
Show comments