Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bali Official Trailer थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी'; प्रदर्शित होत आहे ९ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर

Bali - Official Trailer | Swapnil Joshi | New Marathi Movie 2021 | Amazon Prime Video
, गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (11:00 IST)
अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज मराठी हॉरर थ्रिलर चित्रपट ‘बळी'च्‍या जागतिक रीलीजची घोषणा केली. या चित्रपटामध्‍ये मराठी चित्रपट सृष्‍टीमधील सर्वात प्रख्‍यात कलाकार स्‍वप्‍नील जोशी, पूजा सावंत व समर्थ जाधव असणार आहेत. प्रतिष्ठित चित्रपटनिर्माता विशाल फ्यूरिया ('लपाछपी' आणि त्‍याचा नुकतेच हिंदी रिमेक अ‍ॅमेझॉन ओरिजिनल मूव्‍ही 'छोरी') यांचे दिग्‍दर्शन आणि अर्जुन सिंग बराण व कार्तिक डी.निशानदार यांच्‍या ग्‍लोबल स्‍पोर्टस् एंटरटेन्‍मेंट अॅण्‍ड मीडिया सोल्‍यूशन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेडद्वारे निर्मित चित्रपट ‘बळी भारतामध्‍ये आणि जगभरातील २४० हून अधिक देश व प्रदेशांमध्‍ये ९ डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्‍यास सज्‍ज झाला आहे.
 
चित्रपट ‘बळी' विधुर, मध्‍यमवर्गीय वडिल श्रीकांतच्‍या (स्‍वप्‍नील जोशी) जीवनप्रवासाला दाखवतो. त्‍याचा ७ वर्षाचा मुलगा मंदार (समर्थ जाधव) चक्‍कर येऊन पडतो आणि सविस्‍तर निदानासाठी त्‍याला जनसंजीवन हॉस्पिटलमध्‍ये नेते जाते. येथून श्रीकांतच्‍या जीवनाला अनपेक्षित कलाटणी मिळते. स्थितीला रोमांचक वळण मिळते जेव्‍हा मंदार एका रहस्‍यमय परिचारिकेसोबत बोलायला सुरूवात करतो. तो ती परिचारिका हॉस्पिटलच्‍या पडक्‍या भागामध्‍ये राहत असल्‍याचा दावा करतो. 
 
''अमेझॉन प्राइम व्हिडिओने नेहमीच प्रेक्षकांसाठी कथानक, रोमांचक पटकथा व लक्षवेधक अभिनयासंदर्भात वरचढ ठरणारे कन्‍टेन्‍ट सादर करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे,'' असे अमेझॉन प्राइम व्हिडिओच्‍या भारतीय कन्‍टेन्‍टचे संपादन प्रमुख मनिष मेंघानी म्‍हणाले.
 
''प्रेक्षकांनी चित्रपट 'छोरी'वर केलेला प्रेमाचा वर्षाव पाहता आम्‍हाला विशाल फ्युरियासोबचा सहयोग सुरू ठेवण्‍याचा आनंद होत आहे. ते भारतातील हॉरर शैलीला पुनर्परिभाषित करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. स्‍वप्‍नील जोशी, तसेच प्रतिभावान कलाकारांसह‘बळी आमच्‍या झपाट्याने विकसित होणा-या प्रादेशिक भाषा कन्‍टेन्‍ट पोर्टफोलिओमध्‍ये अधिक मूल्‍याची भर करतो.''
 
दिग्‍दर्शक विशाल फ्युरिया म्‍हणाले, ''हॉरर या शैलीने माझे लक्ष वेधून घेतले आहे आणि या शैलीमधील प्रत्‍येक चित्रपटासह काहीतरी नवीन घेऊन येण्‍याचा माझा सातत्‍याने प्रयत्‍न राहिला आहे. सर्वोत्तम भयपट म्‍हणजे मनावैज्ञानिकाशी संबंधित चित्रपट, जे वास्‍तविकतेपासून दूर असलेल्‍या पात्रांसाठी सहानुभूती निर्माण करतात. आपण जे पाहतो त्‍यावर जितका अधिक विश्‍वास ठेवू, ते तितके अधिक रोमांचक बनत जाते. हेच‘बळी च्‍या बाबतीत आहे. या चित्रपटामधील सर्व पात्रांमधील भावना, भय लक्षवेधक आहेत.

मी माझ्यावर कामावर विश्‍वास ठेवण्‍यासाठी निर्माते अर्जुन व कार्तिक यांचे आभार मानतो. चित्रपट 'छोरी'ला मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर मी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाल्‍यानंतर या चित्रपटाप्रती प्रेक्षकांच्‍या प्रतिक्रिया जाणून घेण्‍यास उत्‍सुक आहे.''

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात