Dharma Sangrah

टायगर आणि हृतिक या दोघांची जबरदस्त जोडी असणारा “वॉर’चे टिझर रिलीज

Webdunia
बुधवार, 17 जुलै 2019 (11:51 IST)
4
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे दोघेही लवकरच “वॉर’या ऍक्‍शनपटात दिसणार आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे दोघे एकत्र काम करताना दिसणार अशा चर्चा होत्या. मात्र, या चित्रपटाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अखेर या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला.
 
“तुझ्या ऍक्‍शनमध्ये कमतरता आहे, ते नीट कसे करतात हे मी तुला शिकवतो,’ असे म्हणत टायगरने हा टीझर शेअर केला. तर, याला ह्रितिकनेही तोडीस तोड उत्तर देत “ज्या क्षेत्राचा मी बादशहा आहे त्या क्षेत्रात तू आताच सुरुवात केली आहेस, थोडा वेळ आराम कर,’ असे म्हणत ह्रितिकने हा टिझर शेयर केला. 53 सेकंदांच्या या टीझरमध्ये अफलातून साहसदृश्‍य पाहायला मिळतात. यामध्ये अभिनेत्री वाणी कपूर देखील पाहायला मिळत आहे.
 
फॉरेन लोकेशन आणि भरपूर ऍक्‍शन, ड्रामा असलेल्या या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टायगर आणि हृतिक या दोघांची जबरदस्त जोडी “वॉर’ मध्ये दिसणार आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या ऍक्‍शन सीनमध्ये हृतिक आणि टायगर एकापेक्षा एक वरचढ दिसत आहेत. यशराज फिल्म या चित्रपटाची निर्मिती करणार असून 2 ऑक्‍टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?

'धुरंधर' ते देवखेल'... OTT वर या आठवड्यात काय पाहाल? या ५ सिनेमा आणि वेब सिरीज नक्की बघा

अरिजीत सिंह करणार राजकारणात एन्ट्री!

कलकी 2' बद्दल नवीन अपडेट, दीपिका पदुकोणच्या जागी दिसणार ही दक्षिणेतील अभिनेत्री!

सोलो ट्रिपचं प्लॅनिंग करताय? ही आहेत भारतातील सर्वात सुरक्षित पर्यटन स्थळे

पुढील लेख
Show comments