Festival Posters

हृतिक- कियाराचे ‘वॉर 2’ या चित्रपटाचे पहिले गाणे ‘आवन जावन’ प्रदर्शित

Webdunia
बुधवार, 6 ऑगस्ट 2025 (14:29 IST)
यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचा पहिला गाणं ‘आवन जावन’ प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चाली सोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून ते रोमच्या ऐतिहासिक आणि मोहक रस्त्यांपर्यंतच्या लोकेशन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
 
दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाले,“या प्रेमगीतासाठी अशी पार्श्वभूमी हवी होती जी प्रेम, प्रवास आणि नात्यांची उर्जा दाखवू शकेल. दोन व्यक्ती प्रेमात आहेत आणि एकत्र जग पाहत आहेत – अशी भावना निर्माण करणारी लोकेशन म्हणून इटली निवडल्यावर मी खूप आनंदी होतो.”
 
कियारा अडवाणी म्हणाली, “इथे अगदी योग्य प्रमाणात ऊन आणि सुखद गारवा होता. मला इथेच थांबावं, आराम करावा आणि या थर्मल पूलमध्ये पोहत राहावं असं सतत वाटत होतं. हे एकदम स्वप्नवत आणि मनमोहक आहे.”
 
कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस म्हणाला ,“टस्कनीने आम्हाला कमालीचं सौंदर्य दिले आहे. इथलं रंगसंगतीचं दृश्य अचूक आहे. ही लोकेशन गाण्याला एक वेगळी उंची देते.”
 
अयान मुखर्जी यांनी रोममधील शूटिंगचा अनुभव शेअर करताना सांगितलं, “रोममध्ये गेल्यावर मला वाटलं की, कोलोसियम, स्पॅनिश स्टेप्स आणि ट्रेवी फाउंटन या आयकॉनिक जागांवर चित्रीकरण करणं आवश्यक आहे. या ठिकाणी शूटिंगसाठी परवानगी मिळवणं खूपच कठीण होतं, पण सुदैवाने सर्व काही जमून आलं आणि आम्ही त्या सर्व ठिकाणी शूट करू शकलो.”
 
त्यांनी पुढे सांगितले, “हे गाणं तयार करताना संपूर्ण टीममध्ये एक सकारात्मक ऊर्जा होती. हे एक ‘फील गुड’ गाणं आहे. आम्हाला हे बनवताना खूप आनंद मिळाला आणि आम्ही प्रेक्षकांनाही तोच आनंद मिळेल अशी आशा करतो.”
 
 ‘आवन जावन’ या गाण्याच्या चित्रीकरणाचा व्हिडिओ येथे पाहा -  
‘वॉर 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे आणि तो आदित्य चोप्रा यांनी निर्मित केलेला आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

नवीन

बिग बॉस २० ची घोषणा, सलमान खान पुन्हा एकदा सूत्रसंचालन करणार

हिमाचल प्रदेशच्या खोऱ्यांमध्ये वसलेले जिभी, पर्यटकांची पहिली पसंती बनले

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: बॉलिवूडच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला

83 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली? ICU मध्ये दाखल, बिग बींच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती

राजस्थान रॉयल्सच्या वादाप्रकरणी इंग्लंड न्यायालयाने राज कुंद्राला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments