Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जान्हवी कपूरला सर्वात कमी मानधन

janhvi kapoor in dhadak
, मंगळवार, 19 जून 2018 (08:46 IST)
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर सिनेमा 'धडक' चा ट्रेलर रिलीज झालाय. मराठी सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे. 20 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे. पदार्पणाच्या सिनेमात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला 1 कोटी मानधनही मिळाले नाही. तिला या सिनेमासाठी 40 ते 45 लाख रुपये फिस दिली गेली. जान्हवीच्या नव्हे तर सिनेमातील हिरोला देखील खास रक्कम मिळाली नाही. शाहिद कपूरचा भाऊ ईशान सिनेमात जान्हवीच्या हिरोची भूमिका साकारत आहे. त्याला या सिनेमासाठी 60 ते 70 लाख रुपये मिळाल्याची चर्चा आहे. याआधी त्याने माजिद माजीदी यांच्या 'बियॉन्ड द क्लाउड' या सिनेमात काम केलंय. धडकमध्ये आशुतोष राणा हिरोईन जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. या रोलसाठी त्याला 50 लाख मिळाल्याचे सांगण्यात येते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'भारत' साठी प्रियंकाने इतके घेतले मानधन