Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जान्हवी पुन्हा एकदा कामावर रुजू

Jhanvi Kapoor
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर तिची मुलगी आता जान्हवी पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे. आगामी ‘धडक’ या चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून जान्हवी सेटवर परतली आहे.
 
गुरुवारपासून जान्हवीने शूटिंगचे काम सुरू केले. मुंबईतील वांद्रे येथे सेट असून सध्या तिथेच शूटिंग सुरु आहे. यावेळी दिग्दर्शक शशांक खैतान आणि मुख्य अभिनेता इशान खत्तरसुद्धा तेथे उपस्थित होते. येथील शूटिंग संपल्यानंतर टीम कोलकातासाठी रवाना होणार आहे आणि तिथेच उर्वरित शूटिंग करण्यात येईल. जुलैमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ नये यासाठी ती कामावर परतली आहे. सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'बबन' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज