Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

John Abraham Birthday special :मॉडेलिंगमध्ये 'धूम' केल्यानंतर बॉलिवूड मध्ये चमकले

John Abraham Birthday special: Shining in Bollywood after 'Dhoom' in modeling John Abraham Birthday special :मॉडेलिंगमध्ये 'धूम' केल्यानंतर बॉलिवूड मध्ये चमकले  Bollywood Gossips Marathi Bollywood Marathi   In Webdunia Marathi
, शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (11:06 IST)
जॉन अब्राहम आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे, पण त्यांच्या  फिटनेसमुळे तो अजूनही त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या कलाकारांवर भारी आहे. 
या अभिनेत्याचा जन्म 17 डिसेंबर 1972 रोजी केरळमध्ये झाला. जॉनचे वडील केरळचे मल्याळी सीरियन ख्रिश्चन होते आणि आई गुजरातमधील पारशी होती. जॉन आपल्या आईच्या खूप जवळ आहे. त्यामुळेच त्यांना अस्खलित गुजराती बोलता येते .
जॉन अब्राहमने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. पण आज जॉन एक यशस्वी अभिनेता आणि निर्माताही आहे. त्यांनी 2003 मध्ये 'जिस्म' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी त्यांचे 'साया' आणि 'पाप' हे आणखी दोन चित्रपटही प्रदर्शित झाले. पण त्यांना खरी ओळख 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'धूम' चित्रपटातून मिळाली. त्यानंतर त्यांनी  मोठ्या पडद्यावर खूप धमाल केली. जॉनने 2012 मध्ये चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. 'विकी डोनर' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. नुकताच त्याचा 'सत्यमेव जयते 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 
जॉन हा एक चांगला अभिनेता तर आहेच पण फार कमी लोकांना माहित आहे की जॉन एकेकाळी खूप चांगले  फुटबॉलपटू असे. जॉन त्यांच्या कॉलेज फुटबॉल संघाचे  कर्णधार होते. 
जॉनने डिसेंबर 2013 मध्ये प्रिया रंचलशी लग्न केले, परंतु 2014 मध्ये त्याने अधिकृतपणे ट्विटर द्वारे याची पुष्टी केली.जॉन यांना सुपर बाइक्सची खूप आवड आहे. यामुळेच जॉन अब्राहमकडे बाईक्सचे उत्तम कलेक्शन आहे. त्यांच्याकडे खूप महागड्या बाइक्स आहेत. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ritesh Deshmukh Birthday Special :राजकीय पार्श्वभूमी असूनही रितेश देशमुखने निवडला अभिनयाचा मार्ग