Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्व आघाड्यांवर स्त्री-कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या ''हश हश'' या अमेझॉन ओरिजिनल मालिकेची घोषणा !

Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (16:46 IST)
मुंबई- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संपूर्णपणे स्त्री-कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा संच घेऊन बनविण्यात आलेल्या आपल्या ''हश हश'' (वर्किंग टाइटल) या मालिकेची घोषणा करण्यासाठी अमेझॉन प्राइम व्हिडिओने जय्यत तयारी केली आहे.
 
'हश हश' (वर्किंग टाइटल)च्या निमित्ताने पुरस्कार विजेत्या भारतीय अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) आणि आयेशा झुल्का (Ayesha Julka) यांचे डिजिटल पडद्यावर पदार्पण होणार आहे. त्यांच्याबरोबर या मालिकेमध्ये कृतिका कामरा (Kritika Kamra), करीश्मा तन्ना (Karishma Tanna), सोहा अली खान (Soha Ali Khan,), शहाना गोस्वामी (Shahana Goswami) यांच्या ही प्रमुख भूमिका असणार आहेत. ही कहाणी मूलत: स्त्रियांच्या नजरेतून उलगडणारी असून, स्वत:ची कहाणी सांगणा-या महिलांच्या कथनातून तिचे कथानक उलगडत जाणार आहे. 'हश हश'साठी प्रोडक्शन डिझायनर, कॉस्च्युम डिझआयनर, सुपरवायझिंग प्रोड्युसर, को-प्रोड्युसर्सपासून ते आर्ट, कॉस्च्युम, प्रोडक्शन कोऑर्डिनेशन पासून ते अगदी सिक्युरिटी टीमपर्यंत बहुतेक सर्वं तांत्रिक कामेही स्त्रियाच सांभाळणार आहेत.
 
अमेझॉन ओरिजिनल ''हश हश'' (वर्किंग टाइटल) ही एका खंबीर नायिकेची कहाणी आहे हे तर झालेच, पण या मालिकेसाठी कॅमे-यामागच्या वेगवेगळ्या कामांची जबाबदारीसुद्धा अत्यंत कुशल अशा स्त्रियांनी पेलली आहे. तनुजा चंद्रा (Tanuja Chandra) (करीब करीब सिंगल, दुश्मन, संघर्ष) या मालिकेच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि एक्झेक्युटिव्ह प्रोड्युसर असणार आहेत तर शिखा शर्मा (Shikhaa Sharma) (शकुंतला देवी, दुर्गामती, लूटेरा) एक्झेक्युटिव्ह प्रोड्युसर आणि मूळ कथा लेखक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखक जुही चतुर्वेदी (Juhi Chaturvedi) (गुलाबो सिताबो, पिकू) यांना मालिकेच्या संवाद लेखनासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. ऍड-फिल्म्सच्या क्षेत्रातील काही उदयोन्मुख नावांपैकी एक कोपल नाथानी या मालिकेच्या एपिसोड डायरेक्टर असणार आहेत. ही मालिकेची निर्मिती विक्रम मल्होत्रा (Vikram Malhotra’s) यांच्या एबंडंशिया एंटरटेन्‍मेंट (ब्रीद, ब्रीद: इनटू द शॅडोज, शकुंतला देवी, एअरलिफ्ट) द्वारे केली जाणार आहे.
 
या ग्रीनलाइट अनाउन्समेंटबद्दल 'हश हश' (वर्किंग टाइटल)च्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि एक्झेक्युटिव्ह प्रोड्युसर तनुजा चंद्रा म्हणाल्या, “भारतातील व्हिडिओ स्ट्रिमिंगने महिला कथाकथनाला अधिक प्राधान्‍य देत कथाकथनामध्‍ये लक्षणीय बदल घडवून आणला आहे आणि याबाबत मला जितका आनंद होईल तो कमीच आहे. माझ्यासारख्‍या दिग्‍दर्शकांनी याच बदलाची दीर्घकाळापासून वाट पाहिलेली आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि एबंडंशिया एंटरटेन्‍मेंट या दोघांनीही विविध प्रकारच्या, उत्तमप्रकारे मांडलेल्या स्त्री-कथा भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. 'हश हश' च्या निर्मितीसाठी आणि या कमालीच्या टीमबरोबर काहीतरी खास निर्माण करण्यासाठी व्हिडिओ स्ट्रिमिंगच्या या विस्तारणा-या समूहासोबत आपल्या ताकदीनिशी उभे राहण्यास मी प्रचंड उत्सुक आहे आणि हे अत्‍यंत खास ठरेल अशी मी आशा करते.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

पुढील लेख
Show comments