Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंगना राणावतचे वाढले भाव

kangana ranawat
, शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (15:12 IST)
कंगना राणावत बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या अटींवर काम करते. तिच्या चित्रपटात ती स्वतः 'हिरो' असते. गेल्या काही वर्षांत कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक भक्कम स्थान निर्माण  केले आहे. रिअल लाईफमध्ये कंगना कितीही वादग्रस्त ठरो. पण बॉक्सऑफिसवर तिचे चित्रपट गर्दी खेचण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे दरवेळी प्रेक्षकांसाठी काही हटके घेऊन येण्याचा कंगनाचा प्रयत्न असतो. लवकरच कंगनाचा 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांशी' हा पीरियड ड्रामा रिलीज होतोय. यानंतर ती 'मेंटल है क्या' या चित्रपटातही दिसणार आहे. 
 
या दोन चित्रपटांबद्दल कंगना इतकी आश्र्वस्त आहे की, 'मेंटल है क्या'च्या निर्मात्यांसमोर तिने एक वेगळीच अट ठेवली आहे. होय, कंगनाने या चित्रपटाच्या नफ्यातील वाटा मागितला आहे. यापूर्वीचे कंगनाचे काही चित्रपट बॉक्सऑफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे 'मेंटल है क्या'चे निर्माते जरा साशंक आहेत. आता निर्माते कंगनापुढे झुकतात की कंगना मागे हटते, ते बघूच. मुळात कंगना राणावत तिचे मानधन सिनेमाच्या बजेटनुसार ठरवत असते. मणिकर्णिका : द क्वीन ऑफ  झांसी या चित्रपटाचे मेकिंग बजेट 120 कोटींपेक्षा जास्त आहे. तेव्हाच मणिकर्णिकासाठी कंगनाने जवळपास 10 कोटी रुपये घेतले असून अभिनेत्रींमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत आता कंगनाचे नाव सामील झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच