Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन कन्नड टीव्ही अभिनेत्यांचा मृत्यू

kannada-tv-actors-rachana-and-jeevan-killed-in-car-crash

बंगळुरुजवळ झालेल्या अपघातात दोन कन्नड टीव्ही अभिनेत्यांचा  मृत्यू झाला आहे. कार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झाला. तर कारमधील इतर कलाकार जखमी झाले आहेत.

रचना, जीवन आणि इतर काही टीव्ही कलाकार गुरुवारी मध्यरात्री सुब्रमण्य गावातील एका मंदिरात चालले होते. सहकलाकाराच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र निघाले होते. त्यावेळी मगदीजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकवर त्यांची कार आदळली.अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झाला, तर रणजित, एरिक, होनेश आणि उत्तम यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी अभिनेता जीवन स्वतः कार चालवत होता. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राकेश बापटने घरात साकारली इको फ्रेंडली गणेशमूर्ती