Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कृती सेनन आणि सुशांतच्या लग्नाची चर्चा

kriti senan sushant singh rajput
, मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (16:09 IST)
हिंदी चित्रपटसृष्टीतील यशाच्या पथावर मार्गक्रमण करणारी अभिनेत्री कृती सेनन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आली नसून, लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल. हा विवाह ती सुशांत सिंह यांच्यासोबत करणार आहे. एका वेबसाइटने सुशांत व कृतीच्या लग्नाविषयीचे वृत्त दिले आहे.
 
सुशांत व कृती ‘राबता’ या सिनेमात एकत्र झळकले होते. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागली. ते दोघेही अनेक पार्ट्यांना व इव्हेंट्‌सला एकत्र असतात. या दोघांच्या नात्याविषयी त्यांच्या परिवारालादेखील काहीच प्रॉब्लेम नसल्यामुळे लवकरच सुशांत व कृती लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. अशा प्रकारे कृती सेनन चित्रपटसृष्टीत कार्यरत असताना ती लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील तिच्या करिअरविषयी चिंता व्यक्त होत आहे, तर सुशांत हादेखील सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत असून तोही यशाच्या पदपथावर आहे. त्यामुळे सुशांतही आता विवाह बंधनात अडकल्याने त्यांच्या प्रगतीला किती आळा बसणार, हे पाहावे लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ची बालकलाकारांकडून अनोखी दिवाळी भेट