Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माधुरी म्हणतेय ‘नाच गड्या’

Webdunia
रविवार, 12 मे 2024 (11:35 IST)
मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारचा  मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या  अभिनय  नृत्यांतून  प्रेक्षकांची मने  जिंकणारी  माधुरी आता ‘अल्याड पल्याड’ चित्रपटातही  आपल्या नृत्याचा जलवा  दाखवणार आहे.  आपल्या मोहक अदांनी घायाळ करणाऱ्या  माधुरीवर एक धमाकेदार आयटम नंबर चित्रीत झालं आहे. ‘दणक्यात साजरा करूया  जागर  नाच गड्या  वाकडा  तिकडा  रांगडा  तू नाच’ असे  बोल असलेले हे धमाकेदार  गाणं सध्या सोशल  मीडियावर चांगलंच  ट्रेंड झालं आहे.   
 
हे धमाकेदार  गाणं  शार्दूल यांनी लिहिलं असून  ऋचा  कुलकर्णी आणि शार्दूल यांच्या दमदार आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे.  वी.आर. ऋग्वेद याचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड' चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे.  
 
 हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल असा विश्वास  माधुरीने व्यक्त केला. 
 
दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला  ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे.  गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, मकरंद देशपांडे,  सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत. 
 
कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत.रंगभूषा अभिषेक पवार यांची आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. प्रोडक्शन मॅनेजरची  जबाबदारी  स्वानंद देव  व विष्णू  घोरपडे यांनी सांभाळली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: प्रसिद्ध दुर्गा मंदिरे, या शारदीय नवरात्रीला भेट द्या

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

सफर निसर्गरम्य बूंदीची

बायको हॉस्पिटलमध्ये

पुढील लेख
Show comments