Publish Date: Thu, 09 Jul 2026 (13:06 IST)
Updated Date: Thu, 09 Jul 2026 (13:09 IST)
मनीष पॉल यांच्या आईचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. मनोरंजन विश्वात आपल्या हजरजबाबीपणासाठी आणि उत्कृष्ट विनोदी शैलीसाठी ओळखले जाणारे अभिनेते आणि टीव्ही होस्ट मनीष पॉल यांच्या घरी दुःखाचे सावट पसरले आहे. मनीष यांच्या आईचे दिल्लीत वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याच्या टीमने एका भावूक निवेदनाद्वारे ही दुःखद बातमी जाहीर केली.
दुःखाच्या या कठीण प्रसंगी चाहते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत
मनीष पॉल यांच्या टीमने प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन करत लिहिले, "अत्यंत दुःखासह आम्ही मनीष पॉल यांच्या आईच्या निधनाची बातमी जाहीर करत आहोत. या कठीण काळात देव त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो." ही बातमी समजताच चित्रपटसृष्टीतील मित्र आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
मनीष पॉल यांच्या कुटुंबात आणखी कोण आहे?
मनीष पॉल नेहमीच प्रकाशझोतात राहत असले तरी, ते त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंब प्रसारमाध्यमांच्या नजरेपासून दूर ठेवणे पसंत करतात. त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये
पत्नी: संयुक्ता पॉल (मनीष यांची बालपणीची मैत्रीण आणि जीवनसाथी), मुलगी सायशा आणि मुलगा युवान आणि त्यांचे वडील जगमोहन पॉल आहे.
त्यांना एक भाऊ विवेक पॉल आणि बहीण ज्योती पॉल मोहन असून त्यांचे कुटुंबाशी घट्ट नाते आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकानंतरही ते नेहमीच आपली पत्नी आणि मुलांसाठी वेळ काढतात. अलीकडेच मनीष त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमुळे चर्चेत होते, जिथे त्यांनी दिग्दर्शक विक्रम आणि सयामी खेर यांच्यासोबत काम करण्याचा आपला अनुभव शेअर केला होता. त्यांच्या आईच्या अचानक निधनामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड धक्क्यात आहे.
About Writer
रूपाली बर्वे
मीडिया क्षेत्रातील २२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या रूपाली बर्वे या एक अष्टपैलू पत्रकार आणि संपादक आहेत. मागील २० वर्षांपासून त्या 'वेबदुनिया' पोर्टलशी जोडलेल्या असून सध्या 'असिस्टंट एडिटर' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी फील्ड रिपोर्टिंग, कंटेंट रायटिंग, डेस्क एडिटिंग आणि डिजिटल मीडिया अशा विविध स्तरांवर काम केले असून, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती....
आणखी वाचा