Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'मन की आवाज प्रतिज्ञा' अभिनेता अनुपम श्याम यांचे निधन

'Mann Ki Awaaz Pratigya' actor Anupam Shyam passes away Bollywood Gossips In Marathi Webdunia Marathi
, सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (10:40 IST)
बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीचे अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन झाले. किडनीच्या संसर्गामुळे त्यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि 9 ऑगस्ट रोजी त्यांच्या अवयवांचे  कार्य थांबल्याने त्यांचा मृत्यू झाला.
 
अनुपम श्याम यांचे मित्र यशपाल शर्मा यांनी ही माहिती दिली. आजकाल अनुपम श्याम 'मन की आवाज: प्रतिज्ञा' या टीव्ही मालिकेत काम करत होते. ते या शोमध्ये ठाकूर सज्जन सिंहची भूमिका साकारत होते.
 
श्यामचे मित्र आणि अभिनेते यशपाल शर्मा यांनी सांगितले की, त्यांना गेल्या चार दिवसांपासून उपनगर गोरगाव येथील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी त्यांचे दोन भाऊ अनुराग आणि कांचन यांच्या उपस्थितीत रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
 
यशपाल शर्मा म्हणाले, डॉक्टरांनी आम्हाला सुमारे 40 मिनिटांपूर्वी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. मी तेव्हा त्यांचे भाऊ अनुराग आणि श्याम सोबत हॉस्पिटलमध्ये होतो त्यांच्या मृतदेह अजूनही रुग्णालयात आहे.मृतदेह न्यू दिंडोशी,म्हाडा कॉलनी येथील त्यांच्या घरी नेण्यात येईल.त्यांचेअंतिम संस्कार दुपारी केले जातील
 
अनुपम श्याम हे आर्थिक संकटातून जात होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी टीव्ही आणि बॉलिवूडसह चाहत्यांकडून मदतीचे आवाहन केले होते, त्यानंतर अनेक सेलेब्सने त्यांना मदत केली. ते 63 वर्षांचे होते.
 
अनुपम श्यामने आपल्या तीन दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत सत्य, दिल से, लगान, हजारों ख्वाइशें ऐसी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. 2009 च्या मालिका 'मन की आवाज प्रतिज्ञा' मध्ये ठाकूर सज्जन सिंह यांच्या भूमिकेलाही समीक्षकांची प्रशंसा मिळाली. सध्या ते  'मन की आवाज: प्रतिज्ञा' च्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग करत होते .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिल्पा शेट्टीला आवडतात अश्लील व्हिडीओ’, ‘या’ अभिनेत्रीचा खळबळजनक दावा