Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘या’अभिनेत्यासोबत विश्‍वसुंदरी मानुषी छिल्लरला करायचेय काम

miss world mahushi chillar
मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या सौंदर्यवती आणि बॉलिवूड यांचे एक अनोखे नाते आहे. त्यांनी बॉलिवूडचा पडदा गाजवला आहे, यात आता नुकतीच विश्वसुंदरी ठरलेली मानुषी छिल्लर ही पदार्पण करण्याची शक्‍यता आहे. बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्यासोबत काम करण्यास आवडेल असा प्रश्न तिला विचारण्यात आला असता, तिने अभिनेता आमीर खानाचे नाव घेतले.
 
मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर मानुषी छिल्लर नुकतीच भारतात परतली. तिच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले असता तिने बॉलिवूड पदार्पणाबद्दलचे सूतोवाच केले. तिला डॉक्‍टर व्हायचे असून त्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनुष्का शर्मा साकारणार सरोगेट मदर?