ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये अटकेत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी गुरूवारी सकाळी शाहरूख खानने भेट घेतली तर त्याच वेळी एनसीबीचे पथक शाहरूखचे निवासस्थान 'मन्नत' या ठिकाणी दाखल झालं आहे.
मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला अशी माहिती मिळत असताना एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यानुसार शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं.
आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरुखने मुलाची भेट घेतली. त्याच दिवशी एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी दाखल झालं आहे. जेलमध्ये कोरोनासंसर्ग पसरण्याच्या भीतीमुळे आर्थररोड जेल प्रशासनाने वकील आणि कुटुंबीयांना कैद्यांची भेट/मुलाखत बंद केली होती.
कोरोनासंसर्ग नियंत्रणात असल्याने 21 ऑक्टोबरपासून जेल प्रशासनाने कोरोना नियम पाळत कैद्यांना भेटण्यासाठी परवानगी पुन्हा सुरू केलीये. ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खानला आर्थररोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय. पोलिसांच्या बंदोबस्ताता शाहरुख मुलाला भेटण्यासाठी जेलमघ्ये दाखल झाला होता.