Netflix आता आपल्या काही टीव्ही शो आणि चित्रपटांसाठी फ्री अॅक्सेस देत आहे. हे पाहण्यासाठी आपल्याला नेटफ्लिक्सवर अकाऊंट तयार करण्याची किंवा सब्सक्रिप्शन घेण्याची आवश्यकता नाही.
नेटफ्लिक्सच्या या फ्री ऑफर अंतर्गत आपण नेटफ्लिक्सच्या फ्लॅगशिप सीरीज स्ट्रेंजर गेम्ससह (Stranger Games) लोकप्रिय फिल्म बर्ड बॉक्स (Bird Box) पाहू शकता.
या व्यतिरिक्त व्हेन द सी अस, लव्ह इज ब्लाइंड आणि बॉस बेबी सारख्या कॉन्टेंट आहे. दरम्यान, याआधी नेटफ्लिक्सवर अशी ऑफर कधी देण्यात आली नव्हती.
मात्र, कंपनीकडे एक महिन्याचा ट्रायलची ऑफर होती. पण, अकाऊंट तयार करून, क्रेडिट कार्डची डिटेल्स सुद्धा भरावा लागत होता. याशिवाय, कधीकधी कंपनी सीरीजचा एक एपिसोड फ्री करण्यात येत असे.
नेटफ्लिक्सच्या या फ्री ऑफर अंतर्गत एकूण 10 चित्रपट आणि सीरीज आहेत. या पाहण्यासाठी आपण Netflix.com/in/watch-free वर जाऊ शकता. याठिकाणी आपल्याला लॉग इन करणे किंवा साइन अप करण्याची (Netflix free offer)आवश्यकता नाही आणि यापैकी 10 सीरीज आणि चित्रपट थेट पाहू शकतात.
ओटीटी प्लॅटफॉर्म वाढत आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन ऑफर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.
भारतीय मार्केटमध्ये पाहिले तर कंपनीने मोबाईल ऑनली प्लॅन आधीच स्वस्त केले आहेत. अलीकडेच, नेटफ्लिक्सने आपला यूजर इंटरफेस हिंदीमध्येही लाँच केला आहे.
हे केवळ (Netflix free offer)भारतासाठीच नाही तर जगभरही आहे. म्हणजे, कोठेही नेटफ्लिक्सची भाषा बदलून हिंदीमध्ये बदलता येते.