Publish Date: Mon, 04 Apr 2022 (18:25 IST)
Updated Date: Mon, 04 Apr 2022 (18:28 IST)
कॉमेडी क्वीन भारती सिंहने चाहत्यांना गोड बातमी दिली. भारती आणि हर्ष यांना मुलगा झाला आहे. एक खास पोस्ट शेअर करत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी Its a BOY म्हणत सोशल मीडियावर ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर चाहत्यांनीही भारती आणि हर्षवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी भारतीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्यात. तसेच अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिलं की, आम्ही छोट्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहे.