Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 25 May 2025
webdunia

‘पानिपत' सापडला वादात, छावा क्रांतिवीर संघटनेने दर्शविला विरोध

'Panipat' was found in opposition to the raid by the Chhath Revolutionary Association
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारीकर ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटातून पानिपतचा इतिहास प्रेक्षकांसमोर सादर करत आहेत. अलिकडेच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. पण प्रदर्शनापूर्वीच ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाला विरोध होत आहे. पानिपत चित्रपटात मराठ्यांच्या पराक्रमाचा अनादर झाल्यास हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराच छावा क्रांतिवीर संघटनेने दिला आहे. त्याबाबतचे निवेदन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
 
‘पानिपत’या चित्रपटात मराठ्यांच्या पराक्रमाचा अनादर झाल्यास हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा छावा क्रांतिवीर संघटनेनी दिला आहे.  येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. पानिपत चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ऐतिहासिक चित्रपटाविषयी महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागून आहे. पानिपतची लढाई होण्याचे मुख्य कारण म्हणजे दत्ताजी शिंदे होय. मात्र, ट्रेलरमध्ये पेशवे आणि अब्दाली यांच्या व्यतिरिक्त कोणत्याच मराठा सरदाराचे नाव देखील नाही. यामुळे मराठ्यांच्या मनात असंतोषाची लाट निर्माण झाली. दत्ताजी शिंदे, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्याशिवाय पानिपत बनतोच कसा? असा प्रश्न मराठी जनतेला पडल्याचे छावा संघटनेनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षयने केली मानधनात मोठी वाढ, इतके आहे मानधन