Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पति पत्नी और वो च्या रीमेकमध्ये कार्तिक, भूमी आणि अनन्या

pati patni aur woh
Webdunia
सोमवार, 21 जानेवारी 2019 (20:37 IST)
सन 1978 मध्ये बीआर चोप्राने 'पति पत्नी और वो' नावाचा चित्रपट बनवला होता, आणि तो बॉक्स ऑफिसवर सुपर हिट झाला होता. आता त्यांच्या परिवारातील अभय चोप्रा आणि रेणू चोप्रा टी-सीरिझच्या भूषण कुमार बरोबर या चित्रपटाचा रीमेक तयार करणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसतील.
 
काही दिवसापासून ह्या चित्रपटाबद्दल चर्चा होतच आहे. तापसी पन्नूने हे सांगून सनसनी पसरवली होती की तिला या चित्रपटात घेण्यात आले आहे. पण नंतर माहिती मिळाली की ती या चित्रपटाचा भाग नाही. यावर निर्मात्याच्या वतीने जारी करण्यात आलेलं अधिकृत विधान आलं की चित्रपटासाठी बर्‍याच कलाकारांशी चर्चा झाली होती, पण याचा अर्थ असा नाही की त्यांची निवड चित्रपटासाठी झाली आहे. तापसी पन्नूला कोणतेही वचन देण्यात आले नव्हते. तापसी एक अतिशय प्रतिभाशाली कलाकार आहे आणि भविष्यात नक्कीच तिच्याबरोबर काम करायला आवडेल.
 
पति पत्नी और वो चा रीमेक मुदस्सर अज़ीज दिग्दर्शित असेल. मुदस्सर लाइटवेट कॉमेडी चित्रपटाचे तज्ज्ञ मानले जातात आणि 'हॅपी भाग जाएगी' या चित्रपटात त्याचं काम प्रेक्षकांनी पाहिले आहे. आशा आहे की या क्लासिक मूव्हीच्या रीमेकमध्ये ते पूर्ण न्याय करतील.
 
41 वर्ष जुने पति पत्नी और वो -  41 वर्षांपूर्वी रिलीझ झालेले चित्रपट 'पति पत्नी और वो' बर्‍याच लोकांना आज देखील आठवत. या कॉमेडी चित्रपटात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. या चित्रपटाचे गीत 'ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए' खूप प्रसिद्ध झालं होत. या कमी बजेट मूव्हीने बॉक्स 
ऑफिसवर मोठा यश मिळविला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप

बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

सर्व पहा

नवीन

सलमानच्या सुरक्षेत त्रुटी, दोन दिवसांत दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसले,रक्षकांनी पकडले

कपील शर्मा फेम कलाकाराचे निधन

संत मुक्ताबाईं समाधी मंदिर मुक्ताईनगर

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप

पुढील लेख
Show comments