Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्षय कुमारच्या शो मध्ये लोकांवर झाला लाठीमार

Webdunia
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (16:36 IST)
'बड़े मियां छोटे मियां' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि टाइगर श्रॉफ लखनौ ला गेले होते. व तिथे त्यांना पहावयास आलेली लोकांची गर्दी ही नियंत्रणाच्या बाहेर गेली. त्यामुळे धक्काबुक्की झाली. 
 
काही दिवसांमध्येच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा  'बड़े मियां छोटे मियां' है चित्रपट प्रदर्शित होणार आहे. म्हणून हे दोघे स्टार त्यांच्या या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी लखनौ येथे गेले होते. सोमवारी ते लखनऊ मध्ये गेले व तिथे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. 
 
लखनौ येथे एका कार्यक्रमात लोकांचा एकच गोंधळ झाला, खूप गर्दी झाली. ज्याला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षादलाला लाठीमार करावा लागला. सोशल मीडिया वर  अक्षय कुमार आणि टाइगर श्रॉफचे कार्यक्रमचे अनेक व्हिडिओ वायरल होत आहे. अक्षय कुमार आणि टाइगर श्रॉफ ने चित्रपटच्या प्रदर्शनच्या वेळी लाइव्ह एक्शन स्टंट पण करून दाखवले. या दरम्यान लोकांचा उत्साह खूप वाढला व गर्दी उसळली. प्रेक्षकांनी गर्दित चपला वगरे तसेच इतर गोष्टी फेकल्या. 
 
तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी गर्दिला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलाला लाठीमार करावा लागला. अभिनेताने प्रेक्षकांमध्ये काही वस्तु टाकल्या होत्या व त्या वस्तु घेण्याकरिता भांडणे झालीत ज्यामुळे त्यांना रोखण्यासाठी लावलेले बेरिकेड्स देखील तुटले .
 
लखनौ मध्ये अक्षय कुमार आणि टाइगर श्रॉफने आले. तसेच त्यांनी चित्रपटच्या एक्शनवर चर्चा केली. तसेच टाइगर ने अक्षयला भारताचा टॉम क्रूज असे संबोधले आणि म्हणाले, मी खूप खुश आहे कारण त्यांना खऱ्या एक्शनखिलाडी सोबत काम करण्याची संधी मिळाली. तसेच अक्षय कुमार यांनी टायगरची देखील प्रशंसा केली. ते म्हणाले की टायगर कडून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. तसेच या बहुप्रशिक्षित चित्रपटाचे निर्देशन अली अब्बास जफर ने केले आहे. या चित्रपटात मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलया एफ आणि रोनित रॉय सारखे कलाकार पण महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जाट' चित्रपटावरील वादानंतर निर्मात्यांनी हा सीन काढून टाकला

जातीभेदक वक्तव्यामुळे अनुराग कश्यप अडचणीत,मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

जाट चित्रपटाच्या वादावर जालंधर पोलिसांनी कारवाई केली, सनी देओल आणि रणदीप हुडा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

या प्रसिद्ध अभिनेत्याने विमान अपघातात मरण्याची इच्छा व्यक्त करत ट्विट केले

अमिताभ बच्चन यांनी फॉलोअर्स कसे वाढवायचे असे विचारले, चाहते म्हणाले रेखासोबतचा सेल्फी टाका

सर्व पहा

नवीन

प्रिय दालचिनी ताईला जायफळ दादाचे पत्र

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सुपरस्टार महेश बाबूला नोटीस पाठवली

छावा'ने इतिहास रचला, 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला, सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला

Summer Special Tourism या पर्यटनस्थळी भेट देण्याची योजना बनवा

रामायणाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी अभिनेता यशने उज्जैनच्या महाकाल मंदिरात आशीर्वाद घेतला

पुढील लेख
Show comments