Festival Posters

नितीन देसाईंच्या खोलीतून पोलिसांना सापडली ऑडिओ रेकॉर्डिंग्स

Webdunia
बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (20:51 IST)
नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं या मागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. पण नितीन देसाई यांच्यावर खूप मोठं कर्ज असल्याने त्यांनी हे पाऊल उचललं असं बोललं जात आहे.
 
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, स्टुडिओतील एका कर्मचाऱ्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनला फोन करून नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. तर त्यानंतर पोलीस आणि त्यांच्या फॉरेन्सिक टीमने त्यांनी ज्या खोलीत गळफास घेतला त्या खोलीची पाहणी केली. त्या दरम्यान पोलिसांना नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणतीही चिट्ठी सापडली नाही, पण त्यांना काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स सापडली आहेत. “या तपासात आम्ही एकेक पाऊल टाकत आहोत. फॉरेन्सिक टीमचं काम पूर्ण झालं की नितीन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येईल,” असं पोलिसांनी ‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना सांगितलं.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

नवीन

गदर'ने विक्रम रचला! प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीबाबत अमिशा पटेलचा धाडसी दावा

महादेवाचे अश्रू पडले, त्या ठिकाणी आजही पाणी आहे; पाकिस्तानातील या चमत्कारिक कुंडाचे रहस्य तुम्हाला माहित आहे का?

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती गोंडस मुलीची आई झाली

आकाशाला स्पर्श करण्याच्या इच्छेपासून ते कोडिंग शिकवण्यापर्यंत, सुशांत सिंग राजपूतची ५० अपूर्ण स्वप्ने

आमिर खानने 'लगान' आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या २५ वर्षांच्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा केला

पुढील लेख
Show comments