Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदीविरोधात प्रियांका चोप्राने बजावली नोटीस

bollywood news
पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीविरोधात अभिनेत्री प्रियांका चोप्राने कायदेशीर नोटीस बजावली आहे. जानेवारी २०१७ मध्ये प्रियांका नीरव मोदीच्या जाहिरातींची ब्रँड अॅम्बेसिडर झाली होती. त्यानंतर ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत नीरव मोदीच्या काही जाहिरातींमध्येही झळकली. मात्र, यासाठी झालेल्या करारानुसार मानधन न मिळाल्याचा ठपका ठेवत प्रियांकाने ही नोटीस बजावली आहे.
 
सिद्धार्थ मल्होत्राही नीरव मोदीशी झालेला जाहिरातीचा करार मोडणार असल्याची माहिती ‘फर्स्टपोस्ट’ने दिली आहे. ११, ४०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात हिरेव्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या काही कंपन्या तसेच अन्य नामांकित जवाहिरे कंपन्यांवर संशय आहे. त्यामुळे नीरव मोदीच्या जाहिरातींशी जोडले गेल्याने आपली प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी सिद्धार्थ हा करार मोडणार आहे. सिद्धार्थ नीरव मोदीचे आणखी दोन जाहिराती शूट करणार होता, पण हा घोटाळा समोर आल्याने तो कंपनीसोबतचा करार मोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दृष्टिबाधितांनाही अनुभवता येणार "प्रभो शिवाजी राजा" ची चरित्रगाथा !