Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझे नाक ओरिजनलच: प्रियांका

प्रियांका चोप्रा नाक प्लास्टिक सर्जरी
देसी गर्ल प्रियांका चोप्रा अमेरिकेत आता सुपरिचित झालेली आहे. अ‍मेरिकेत एक प्रसिद्ध चॅटशोमध्ये तिने दिलखुलास उत्तरे दिली आहेत. मी नाकाची प्लास्टिक सर्जरी केली नसून माझे नाक ओरिजनलच आहे, असे तिने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
 
द व्ह्यू या चॅट शोमध्ये तिने विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. विशेष करून मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतरही बॉलीवूडमध्ये प्रवेश करताना कसा त्रास झाला? आणि तिच्या दिसण्यावरून काय काय सल्ले मिळाले हे प्रियांकाने खुलेपणाने सांगितले. ती म्हणाली मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर मी एका निर्मात्याला भेटले होते. माझे नाक योग्य नाही, मी सुंदर नाही, माझे शरीर बेढब आहे, असे बरेच काही या निर्मात्याने ऐकवले होते. यावेळी मुलाखतकर्त्यांने तुझे नाक ओरिजनल आहे का? असा प्रश्न तिला‍ विचारला यावर ती म्हणाली, होय माझे नाक ओरिजनलच आहे. महिलेने कसे दिसले पाहिजे या बद्दल चुकीचे मत बनवण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘पूर्णा’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित