Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुनीतच्या निधनाने चाहत्याने धसका घेतला, एकाने आत्महत्या केली तर दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी अंत

Puneet's death shocks fans
, शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (14:13 IST)
आपल्या चाहत्या लाडक्या कलाकारांसाठी त्यांचे फेन्स काहीही करतात. त्यांचे छायाचित्र आपल्या कडे साठवून ठेवतात तर काहीजण असे काही करतात जेणे करून ते आपले प्रेम त्या कलाकारासाठी दाखवतात. कन्नड सुपरस्टार पुनीत कुमारची अकाली झालेली एक्झिट चाहत्यांना चटका लावून घेणारी ठरली. आपल्या लाडक्या कलाकाराच्या अकाली निधनाच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे. आपल्या चाहत्यांमध्ये अप्पू नावानं ओळखला जाणाऱ्या पुनीत एकाएकी सोडून गेल्याचे दुःख त्याच्या चाहत्यांना सहन झाले नाही. पुनीतच्या एका चाहत्याने आत्महत्या करून आपले आयुष्य संपविले .बेळगावी जिल्ह्यातील अथणी येथे राहुल गाडीवड्डरा ने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर बेळगावीच्या शिंदोली गावात परशुराम देमनन्नावर आणि कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील हनूर तालुक्यात मरूर गावात राहणारे मुनिअप्पा यांचे हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. पुनीत चे वयाच्या 46 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . पुनीत ने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली. त्यांना 'बेट्टाडा होवू' या चित्रपटासाठी बरेच पुरस्कार मिळाले.  राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी पुनीत ने वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने त्यांचा चाहत्यांना तसेच चित्रपट सृष्टीत सर्वाना मोठा धसका बसला आहे. सगळीकडे शोककळा पसरली आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनीमून डेस्टिनेशन : सुंदर देशांना भेट देण्याची सुवर्ण संधी