इंडीस्टार राधिका आपटेने नुकतीच 'मिसेस. अंडरकव्हर' या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे 45 दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. कोरोना काळातील आरोग्याची गंभीर स्थिती पाहता, यामध्ये कुणाचेच दुमत नसेल की या चित्रीकरणाचा अनुभव कसा असेल.
राधिकाने स्वत:च याविषयीचा खुलासा केला, ती म्हणाली, "अनुभव काही वेगळा नव्हता, आम्ही वारंवार कोरोना चाचण्या करत होतो. आम्ही सगळेच जण तिथे बरीच सावधगिरी बाळगत होतो आणि आरोग्य व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करत होतो. त्याशिवाय इतर सर्व काही अगदी सारखेच होते."
शूटिंग दरम्यान अभिनेत्रीने सर्व आवश्यक ती सावधगिरी बाळगली. हॉटेलपासून लोकेशनपर्यंत फक्त तेवढाच आवश्यक प्रवास करण्यात आला असून चित्रिकरणाशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे रद्द केल्या गेल्या होत्या.
ही ओटीटी क्वीन सध्या यशाच्या शिखरावर असून तिच्याकडे अनेक मुख्य मासिकांची मुखपृष्ठे आहेत तसेच, 'ओके कॉम्प्यूटर' या वेब सीरिजमध्ये तिच्या अभिनयाबद्दल कौतुक झाल्यानंतर राधिका, भविष्यात लवकरच काही प्रमुख चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये मिसेस अंडरकव्हर आणि काही अघोषित प्रकल्पांचा सहभाग आहे.