Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

RajiniKanth: रजनीकांतचा पुढचा चित्रपट लोकेश कनगराज दिग्दर्शित 'थलैवर 171' ची घोषणा

Webdunia
सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (22:37 IST)
सुपरस्टार रजनीकांत अलीकडेच तमन्ना भाटियासोबत 'जेलर' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचे आणि सुपरस्टारच्या अभिनयाचे प्रेक्षकांसह अनेक सिनेतारकांनी कौतुक केले. आता सर्वांच्या नजरा त्याच्या पुढच्या चित्रपटाकडे लागल्या आहेत. आता रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याच्या पुढील चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. लोकेश कनगराज लिखित आणि दिग्दर्शित रजनीकांत यांच्या पुढील चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली.
 
दिग्दर्शक कनगराज साऊथचा सुपरस्टार दलपती विजयसोबतच्या 'लिओ'च्या रिलीजची वाट पाहत असतानाच रजनीकांतही 'जेलर'च्या यशाचा आनंद लुटत आहेत. आता कनगराज आणि रजनीकांत त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. सन पिक्चर्सने त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा आज सोमवारी X (ट्विटर) वर केली.
 
कलानिधी मारन यांनी सादर केलेल्या या चित्रपटाचे तात्पुरते नाव 'थलाईवर 171' असे आहे, जो अभिनेता म्हणून रजनीकांतचा 171 वा चित्रपट आहे. सन पिक्चर्सने केलेल्या घोषणेमध्ये असे लिहिले आहे की, “सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'थलाईवर 171' ची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. हा चित्रपट लोकेश कनगराज लिखित आणि दिग्दर्शित  आहे. 
 
लोकेश 2023 मध्ये विजय आणि तृषा कृष्णन अभिनीत 'लिओ', 2022 मध्ये कमल हासन आणि विजय सेतुपती अभिनीत 'विक्रम' आणि कार्ती अभिनीत 'कैथी' फ्रेंचायझी यासारखे काही मेगा-यशस्वी चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी ओळखले जातात. 2023 मध्ये आलेल्या 'भोला' या चित्रपटासाठी त्याने बॉलिवूड स्टार अजय देवगणसोबतही काम केले आहे.
 
रजनीकांतबद्दल सांगायचे तर 10 ऑगस्टला रिलीज झालेला 'जेलर' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिधी मारन निर्मित आणि नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित 'जेलर' मध्ये रजनीकांत सोबत रम्या कृष्णन, योगी बाबू, विनायकन, तमन्ना भाटिया आणि मास्टर ऋत्विक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर मोहनलाल, शिव राजकुमार आणि जॅकी श्रॉफ या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत आहेत.
 
Edited by - Priya Dixit    
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट 'रेड २' ने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला, ९ व्या दिवशी जबरदस्त कलेक्शन

Border 2: संदेशे आते है गाण्याचे नवीन व्हर्जन तयार,सोनू निगम सोबत हा गायक गाणार गाणे

प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का, कन्नड चित्रपटातून गायकाचे गाणे काढून टाकले

सुनील शेट्टीचा केसरी वीर 16 मे रोजी प्रदर्शित होणार नाही, या दिवशी येणार

अभिनेत्री मलायका अरोरा पासून श्रद्धा कपूर पर्यंत अनेक स्टार्सनी भारतीय सैन्याला सलाम केला

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

Valley of Flowers Uttarakhand येथे अनेक प्रकारची फुले उमलतात

प्रसिद्ध गायक सोनू निगमला उच्च न्यायालयाकडून दिलासा

'धक-धक' गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक

पुढील लेख
Show comments