Publish Date: Mon, 05 Dec 2016 (11:55 IST)
Updated Date: Mon, 05 Dec 2016 (11:57 IST)
सुपरस्टार अभिनेता रजनीकांत पायाला मार लागल्याने जखमी झाले आहेत. '2.0' या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरण्याच्यावेळी ही घटना घडली. येथील केलम्पकम खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र किरकोळ मार असल्याने काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले.
शनिवारी रात्री 8च्या सुमारास '2.0' या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होते. त्यावेळी मारधाड दृश्य देत असताना त्यांच्या पायाला आणि गुडघ्याला मार लागला. त्यामुळे तात्काळ चित्रिकरण थांबवून खाजी रुग्णालयात हलविण्यात आले.