तब्बल आठ वर्षांनंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राजकारणात प्रवेशाबाबत भाष्य केलं. ”जर मी राजकारणात प्रवेशाचा निर्णय घेतला. तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सदैव दूर ठेवेन,” असं म्हणाले.
यावेळी त्यांनी 21 वर्षांपूर्वीच्या आपल्या कृतीबद्दलही खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, ”21 वर्षांपूर्वी काही राजकीय पक्षांच्या आघाडीला समर्थन देऊन चूक केली. त्यावेळी राजकीय फायद्यासाठी माझ्या नावाचा वापर केला गेला, पण मी अद्याप कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं नाही.” ते पुढे म्हणाले की, ”परमेश्वरानं आपल्याला अभिनेता बनवलं. आणि मी माझ्या चाहत्यांना कधीही नाराज करणार नाही, असं वचन देतो.” रजनीकांत यांनी 1996 च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांच्या विरोधात प्रचार केला होता. यामुळे या निवडणुकीत जयललिता यांचा दारुण पराभव झाल्याचं बोललं जातं.