Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ranbir Alia Marriage: रणबीर कपूरचा बंगला लग्नासाठी सजला, लग्नाची तयारी सुरू!

Webdunia
रविवार, 10 एप्रिल 2022 (16:09 IST)
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाबाबत दोघांच्याही कुटुंबीयांनी मौन बाळगले असले तरी लवकरच घरात सनई चौघडे वाजणार आहे. गुजरातमधील रणबीर कपूरच्या कृष्णा राज बंगल्याची सजावट सुरू झाली असून संपूर्ण बंगला सुंदर रोषणाईने सजवण्यात आला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नामुळे ही सजावट केली जात असल्याचे मानले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
 
बंगल्याला नव्या नवरी प्रमाणे सजवल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये कारागीर सजावट करताना दिसत आहेत.  एका रिपोर्टनुसार, या सजावटीचा लग्नाच्या तारखेचा संबंध आहे, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 14 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. वेडिंग प्लॅनर नेमण्याऐवजी आलियाच्या मॅनेजरने लग्नाच्या तयारीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. 
 
रिपोर्टनुसार, लग्नाला फक्त 50-60 लोक उपस्थित राहतील आणि त्यानंतर होणाऱ्या समारंभात  एकूण 100 लोकांना आमंत्रित केले जाईल. हे लग्न अगदी नॉन-ग्लॅमराइज ठेवण्यात येणार असून आलिया-रणबीर एका छोट्याशा समारंभा प्रमाणे लग्न करणार असल्याची माहिती आहे.
 
आलिया भट्ट लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा घालू शकते जे सुप्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केले आहे. रणबीर कपूरच्या आउटफिटबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लग्नाचे फोटो लीक करणे खूप कठीण होईल कारण पाहुण्यांना त्यांचे फोन ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडेकोट असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

पुढील लेख
Show comments