Daily Horoscope
✕

सैफ आता प्रभासशी दोन हात करणार

Webdunia
गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (16:26 IST)
अभिनेता सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षात सैफच्या अभिनयाचे विविध पैलू पाहायला मिळाले आहेत. सेक्रेड गेम्समधला 'सरताज', जवानी जानेमनमध्ये कॅसिनोव्हा, तान्हाजीमधील 'उदयभान राठोड' आणि अशा अनेक भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 
 
आता पुन्हा एकदा सैफ एका वेगळ्या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान ओम राऊत दिग्दर्शित 'आदीपुरूष' या सिनेमात अभिनेता 'प्रभास'शी दोन हात करताना दिसणार आहे. सैफ आता 'लंकेश' अर्थात रावणाची भूमिका साकारणार आहे.
 
प्रभासने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्याने असे लिहिले आहे की, '7000 वर्षांपूर्वी जगभरातील सर्वात हुशार राक्षस अस्तित्त्वात होता. #Adipurush #SaifAliKhan'. प्रभासच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर खूप कमेंट्स करण्यात आल्या आहेत. प्रभास आणि सैफ अली खान हे दोन्ही ताकदीचे अभिनेते एकाच पडद्यावर पाहता येणार याकरता चाहते उत्सुक आहेत.
 
दरम्यान अभिनेत्री करीना कपूरने देखील सैफ अली खानच्या या भूमिकेबाबत एक रंजक पोस्ट केली आहे. तिने आदीपुरुषचे पोस्टर शेअर करताना असे म्हटले आहे की, 'इतिहासातील सर्वात देखणा डेव्हिल लवकरच घेऊन येतोय, My Man सैफ अली खान'.
 
दरम्यान सैफ अली खान देखील या भूमिकेबाबत उत्सुक आहे. आधी 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' मध्ये ओम राऊत आणि सैफची केमिस्ट्री पाहायला मिळाली. ती भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता ही जोडी पुन्हा काय जादू करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 
दरम्यान हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, मलयाळम, कानडी आणि काही आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षीपासून सिनेमाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनाची तारीख 2022 मध्ये जाऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

पुढील लेख
Show comments