Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने बनविलेले मटण बिर्याणी तर करिश्माने असे केले कौतुक

saif ali khan
, सोमवार, 25 मे 2020 (13:13 IST)
देशभरात ईदचा सण साजरा केला जात आहे. लॉकडाऊनमुळे मुस्लिम समाज यावेळी आपल्या घरातच ईद साजरे करत आहे. बरेच कलाकार आपल्या चाहत्यांना ईद मुबारक म्हणत आहेत. दरम्यान, अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ईदच्या निमित्ताने तिचा नवरा आणि अभिनेता सेफ अली खान आपल्या पत्नीसाठी शेफ बनला आहे आणि त्याने त्यांच्यासाठी मटण बिर्याणी बनविली आहे.

करीना कपूर सध्या सोशल मीडियावर खूप अॅेक्टिव आहे. चाहते तिच्या पोस्टाची आतुरतेने वाट पाहत असतात. ईदच्या निमित्ताने करीनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटोही शेअर केला असून तिच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेफच्या बिर्याणीचा फोटो शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "शेफ सैफू, मटण बिर्याणी वेड लागणारे भोजन. ईद मुबारक.
saif ali khan
 
करीना शिवाय करिश्मा कापुराने सेफ अली खानचा ईद डिशचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि सेफचे खूप कौतुक केले आहे.
 
करिश्मा कपूरने लिहिले की, 'शेफ सैफूची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट मटण बिर्याणी …. करीना कपूरसोबत लंच ...
क्वारंटाइनमध्ये सेफ करीना आपला दर्जेदार वेळ एकमेकांसोबत व्यतीत करत आहे. करीनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तैमूर आणि सेफचे रोमांचक फोटो शेअर केले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहरुख खानवर दोन मराठी लेखकांनी केला स्क्रिप्ट चोरीचा