Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान खानने शाहरुख आणि आमिरची केली स्तुती व स्वत:ला सांगितले सामान्य अभिनेता

salman khan
, शनिवार, 13 एप्रिल 2019 (12:43 IST)
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने नुकताच, त्याच्या आगामी चित्रपट 'दबंग'चा पहिला शेड्यूल पूर्ण केला आहे. त्याची जगभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. 2019 ईदच्या प्रसंगी त्याचे चित्रपट 'भारत' रिलीज होणार आहे, ज्याची प्रेक्षकांना खूप वाट आहे.
 
अलीकडील मुलाखतीत सलमानने आपल्या करिअर, अभिनय आणि चित्रपटांबद्दल गोष्टी केल्या. यासह त्याने  शाहरुख आणि आमिर खानबद्दलही गोष्टी केल्या. सलमान म्हणाला की शाहरुख खान हा महान अभिनेता आहे आणि तसेच आमिर खानही. त्या दोघांचे एक-दोन वाईट चित्रपट असू शकतात पण ते नंतर धमाल कमबॅक करतात.
salman khan
सलमान म्हणाला की समस्या तर माझी आहे. शाहरुख आणि आमिर यांना त्यांची कला माहीत आहे. पण मी ऐकले आहे लोक माझ्याबद्दल हा विचार नाही करत. माझ्या बाबतीत असे आहे की मी एक सामान्य प्रतिभा आणि नशिबामुळे जगतोय. मी कसे जगतोय हे मलाच माहीत नाही. माझे अप्स आणि डाउन चालत राहतात. देवाच्या आशीर्वादाने माझी फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. लोक माझे चित्रपट पाहण्यासाठी पैसे खर्च करतात आणि ते टीव्हीवर देखील चित्रपट पाहतात. याशिवाय ते मला शोमध्ये देखील पाहतात. मला नाही माहीत की हे कधी पर्यंत चालेल, पण जोपर्यंत चालत आहे मी माझं सर्वोत्तम देत राहणार. मला याची काळजी नाही की मी कोणत्या अडचणीतून जात आहे?
salman khan
सलमान खान लवकरच भारत या चित्रपटात पुन्हा एकदा कॅटरीना कैफसह दिसणार आहे. सलमान आणि कॅटरीनाशिवाय दिशा पाटनी, तब्बू, नोरा फतेही आणि जॅकी श्रॉफदेखील मुख्य भूमिकेत दिसतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनमध्ये ‘अंधाधून’ सुपरहिट