Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान खान तब्बल 6 महिन्यानंतर गेला सिनेमाच्या शूटला

Salman Khan
, सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (08:08 IST)
बॉलिवूडचा दबंग सलमान खानने (Salman Khan) तब्बल साडेसहा महिन्यांनी शूटिंगला सुरुवात केली आहे. इतक्या महिन्यांनी सेटवर आल्यामुळे सलमान खानने आनंद व्यक्त केला आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सलमानने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. साडेसहा महिन्यांनी सेटवर आल्यामुळे आनंद वाटतो आहे, असं कॅप्शनही सलमानने दिलं आहे.
 
कोरोनाच्या काळात सगळ्या सिनेमा आणि मालिकांचंचं शूटिंग बंद होतं. त्यामुळे सलमानच्या 'राधे: यूअर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe Your Most Wanted Bhai) या सिनेमाचं शूटिंगही थांबवण्यात आलं होतं. आता सगळ्या नियमांचं पालन करून शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे.
 
सिनेमाच्या सेटवर फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. शूट सुरू होण्याआधी कलाकारांसह सर्व टीमची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. राधे सिनेमामध्ये सलमानसोबत जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, रणदीप हुडा असे दिग्गज कलाकारदेखील खास भूमिकेत दिसणार आहेत. राधे सिनेमासोबत किक-2, कभी ईद कभी दिवाली या प्रोजेक्टवरही सलमानचं काम सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमागृहात रिलीज होणार