Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझ्या मुलांनी माझ्याप्रमाणे होऊ नये - संजय दत्त

sanjay datta
, सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (15:55 IST)
ड्रग्जचे व्यसन आणि कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागलेला अभिनेता संजय दत्त त्याच्या मुलांप्रती खूपच संवेदनशील आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्त शिक्षा भोगून बाहेर आला असून, पुन्हा एकदा फिल्मी ट्रॅकवर परतला आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘भूमी’या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
 
माझ्या मुलांनी माझे गुण घेऊ नयेत असे मत संजय दत्तने व्यक्त केले आहे. ‘मी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी शिकवतोय. मोठ्यांचा, आपल्या मदतनीसांचा आदर करणं, आपले संस्कार काय आहेत हे समजून घेणं या सर्व गोष्टींची मी त्यांना शिकवण देतोय. मी फक्त एवढीच प्रार्थना करु इच्छितो की, मुलाने माझ्याप्रमाणे होऊ नये. कारण, माझ्यामुळे माझ्या वडिलांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या आहेत, त्याच यातना सोसण्याची माझी इच्छा नाही’, असं संजय दत्तने म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गल्लीत ओळखत नाही कुत्रं