suvichar

‘सिक्रेट सुपरस्टार’ चा ट्रेलर रिलीज

Webdunia
गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (17:00 IST)

आमीर खान आणि ‘दंगल गर्ल’ झायरा वसिम यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आमीर खानने ट्विटरवरुन हा ट्रेलर रिलीज केला आहे.

14 वर्षांच्या इन्सियाला पार्श्वगायिका होऊन जगभरात नाव कमवण्याची इच्छा आहे. इन्सियाच्या आईचा तिला छुपा पाठिंबा आहे, मात्र वडिलांचा ठाम विरोध आहे. 2 मिनिटं 45 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये तिचा हा प्रवास उलगडताना दिसतो.

वडिलांच्या विरोधानंतरही इन्सिया बुरखा घालून गाणं गाते आणि यूट्युबवर व्हिडिओ शेअर करते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला प्रसिद्धी मिळते. यापुढे काय होतं, हे चित्रपटात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.  अद्वैत चंदन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आमीर खान, किरण राव यांची निर्मिती असलेला हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑक्टोबर 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

नवीन

कॉकटेल 2 चित्रपटाची झलक: मैत्री, प्रेम आणि भावनांच्या भोवऱ्यात सापडलेल्या नव्या पिढीची कहाणी

अरबाज खानच्या सुरक्षेत मोठी त्रुटी, अज्ञात व्यक्ती गाडीत शिरला

देशात या ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस, हिरवळ आणि नैसर्गिक दृश्यांचे प्रेमी असाल तर नक्कीच भेट द्या

कर्करोगाशी झुंज देणाऱ्या दीपिका कक्करने इम्युनोथेरपीचा परिणाम, तीव्र अंगदुखी आणि तापाबद्दल सांगितले

छावा'फेम अभिनेत्री संचिता उगले ने संपवलं जीवन

पुढील लेख
Show comments