Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुखने केले अॅटलीच्या चित्रपटाचे टीजर

Shah Rukh Khan
, बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (19:11 IST)
शाहरुख खान ‘पठान' चित्रपटानंतर अॅटलीच्या चित्रपटावर काम करणार आहे. यात तो दुहेरी भूमिकेत आहे. यात त्याच्यासोबत नयनतारा दिसणार आहे. सध्या शाहरुखने चित्रपटाचे टीजर शूट केले आहे. चित्रपटाच्या सुरुवातीचा टीजरचा भाग आधीच शूट करण्यात आला आहे.
 
सूत्रानुसार, 15 ऑगस्ट रोजी चित्रपटाची घोषणा होईल. याच्या शूटिंगसाठी 180 दिवसांचे शेड्यूल ठरले आहे. चित्रपटाचे शूटिंग दुबईत सुरू होणार आहे. शाहरुखने यापूर्वी ‘डुप्लिकेट' आणि  ‘फैन'सारख्या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे. मात्र त्याला नव्या पद्धतीने दुहेरी भूमिकेत घेतले जाईल. अॅटली यांनी यापूर्वी दक्षिणेचा स्टार विजयलादेखील ‘बिगिल' मध्ये दुहेरी भूमिकेत घेतले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रकाश राज यांचा अपघात झाला,शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला रवाना