Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्यनमुळे शाहरुख खानचे नुकसान, BYJU' ने शाहरुखच्या सर्व जाहिरातींवर बंदी घातली!

Shah Rukh Khan's loss due to Aryan
, शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (21:47 IST)
आर्यन खान काही काळपासून क्रूज ड्रग्स संदर्भात सतत चर्चेत आहे. अशा परिस्थितीत आता त्याचा परिणाम त्याचे वडील शाहरुख खानच्या व्यावसायिक जीवनावरही दिसून येत आहे.बायजूस (BYJU'S) या लर्निंग अॅपने शाहरुखच्या सर्व जाहिरातींवर सध्या बंदी घातली असल्याचे सांगितले जात आहे. 
 
या प्रकरणामध्ये आर्यनचे नाव समोर आल्यावर सर्वत्र  शाहरुख खानचे चाहते त्यांना सपोर्ट करत आहे आणि दुसरीकडे शाहरुख खान यांना सोशल मीडियावर भरपूर ट्रोल केले जात आहे. त्यानंतर अशा बातम्या समोर येत आहेत की बायजूस (BYJU'S)ने शाहरुखच्या सर्व जाहिरातींवर तूर्तास बंदी घातली आहे, तर  प्री-बुकिंग जाहिरात देखील रिलीज केली जात नाही. 
 
या निर्णयाचे कारण काय असू शकते,
सोशल मीडियावर अनेक ट्रोल्स देखील ट्रोलिंगमध्ये बायजूस चे लर्निंग अॅप ला ओढले जात आहेत. ट्रोल पोस्टमध्ये असे म्हटले जात आहे की, शाहरुखला ब्रँड अॅम्बेसेडर बनवून कंपनी काय संदेश देत आहे? कलाकार हे सर्व त्यांच्या मुलाला शिकवतात का? त्याचबरोबर शाहरुखमुळे बायजूसचे अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत. असे म्हटले जात आहे की कंपनीची प्रतिमा सोशल मीडियावर खराब होत आहे, ज्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे.
 
शाहरुख खानने सुमारे 40 कंपन्यांचे समर्थन केले
 शाहरुखन चित्रपट झिरो नंतरही ऑनस्क्रीन वर दिसले नाही, परंतु जाहिरातींच्या जगात शाहरुखचे वर्चस्व आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान सुमारे 40 कंपन्यांचे समर्थन करते .बायजूस  व्यतिरिक्त, या यादीमध्ये आयसीआयसीआय बँक, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिझम, हुंडई यांचा समावेश आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरात्र विशेष: मत्‍स्‍योदरी देवी मंदिर अंबड मराठी माहिती : अंबडची मत्स्योदरी देवी