Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'अंतिम'साठी शाहरुख खान होता पहिली चॉईस

Shah Rukh Khan
, सोमवार, 21 डिसेंबर 2020 (13:37 IST)
अलीकडेच बातमी आली होती की, सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्माने ‘अंतिम : द फायनल ट्रूथ' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमातील सलमानचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. आता या सिनेमाविषयीची डिटेल्स समोर येत आहेत. आयुष शर्माची मुख्यग भूमिका असलेला हा सिनेमा ‘मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक आहे. ‘मुळशी पॅटर्न'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
 
‘अंतिम'मध्ये आयुष एका शेतकर्याच्या मुलाची भूमिका साकारतो आहे. जो नंतर  गँगस्टर बनतो. या सिनेमात सलमान एक पोलीस अधिकार्यारच्या ‍भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे नाव आधी ‘धाक' असे होते. शाहरुख खानला प्रथम या सिनेमाची ऑफर देण्यात आली होती, पण शाहरुखने या सिनेमास नकार दिला. वास्तविक या चित्रपटातील मुख्य भूमिका आयुष शर्माची आहे तर पोलीस अधिकार्यावची भूमिका सेकंड लीड आहे. जेव्हा शाहरुखला ‘अंतिम'ची ऑफर देण्यात आली होती, त्यावेळी त्याला ‘पठाण' सिनेमाची ऑफरही देण्यात आली होती. पण शाहरुखने या दोन्ही चित्रपटांमधून ‘पठाण'ची निवड केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नेहा कक्कडच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या चुकीच्या होत्या, गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी नाटक केले गेले होते