Daily Horoscope
✕

Shaitaan : शैतान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Webdunia
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (10:20 IST)
अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांच्या 'शैतान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगणसोबत ज्योतिका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'शैतान'चा ट्रेलर पाहता हा एक थ्रिलर हॉरर चित्रपट असल्याचा अंदाज बांधता येतो. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्साह आहे.
 
विकास बहलच्या 'शैतान' या चित्रपटाचा ट्रेलर आज मोठ्या स्टाईलमध्ये रिलीज झाला आहे. यावेळी अजय देवगण, ज्योतिका, आर माधवन आणि जानकी बोडीवाला उपस्थित होते. काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये अजय देवगण खूपच सुंदर दिसत होता. दरम्यान, चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा माधवन स्टायलिश ओव्हरकोटमध्ये दिसला.
 
ट्रेलर रिलीज दरम्यान चित्रपटाची आघाडीची अभिनेत्री ज्योतिका देखील मंचावर दिसली होती. निळ्या रंगाच्या शूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अजय आणि ज्योतिकाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
अजय देवगण आणि आर माधवन यांच्या 'शैतान' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्साह आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता अजय देवगणच्या मुलीला कुठल्यातरी वाईट शक्तीने झपाटले आहे. अजय देवगण आणि ज्योतिका आपल्या मुलीला त्याच वाईट शक्तींपासून वाचवण्याच्या प्रयत्नात लढताना दिसतात. या चित्रपटात आर माधवन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विकास बहलचा हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
 
Edited By- Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर; 'लग जा गले' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

कोकणातील लपलेला स्वर्ग 'वेळास गाव'; जिथे निसर्ग आणि संस्कृती एकत्र नांदतात

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ सेटवर परतला, लग जा गले'चे चित्रीकरण पूर्ण केले

'रामायण' हिट की फ्लॉप? आत्ताच निष्कर्ष काढण्याची घाई का? २००० ते ४००० कोटींच्या बजेटमागील नेमकं सत्य काय?

पुढील लेख
Show comments