Publish Date: Mon, 07 Oct 2024 (12:50 IST)
Updated Date: Mon, 07 Oct 2024 (12:53 IST)
गायक अदनान सामी यांच्या आई नौरीन सामी खानचे आज सकाळी निधन झाले त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.अदनान सामी यांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.गायक अदनान सामी आईच्या निधनाने भावुक झाले आहे.
अदनान यांच्या आई बरेच दिवसांपासून आजारी होत्या त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
अदनान ने एक भावनिक नोट शेअर करत आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले, मी अत्यंत दुःखी मनाने माझी आई नौरीन सामी खान यांच्या निधनाची वार्ता देत आहे. त्या एक अद्भुत महिला होत्या त्यांनी प्रत्येकाशी प्रेम आणि आनंद सामायिक केला. आम्ही आज एकटे पडलो.त्यांची खूप आठवण येईल. दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना.