Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

Janhavi Kapoor
, बुधवार, 2 जानेवारी 2019 (10:35 IST)
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी सिनेमांसाठी जोमाने तयारीला लागली आहे. जान्हवीने पहिल्याच सिनेमातून सगळ्यांनाच प्रभावित केलं. या चित्रपटाच्या यशानंतर ती दोन बिग बजेट सिनेमांमध्ये भूमिका साकारणार आहे. त्यातील दिग्दर्शक करण जोहरच्या 'तख्त' सिनेमात जान्हवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मुघल साम्राज्यावर आधारित आहे. म्हणून या चित्रपटासाठी जान्हवी उर्दू शिकत आहे. 
 
चित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, अनिल कपूर, विक्की कौशल यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा मुघल साम्राज्यावर आधारित असल्याने सिनेमातील कलाकारांना उर्दू भाषा शिकावी लागणार आहे. यांत जान्हवी जैनाब्दी महल उर्फ हिराबाईची भूमिका साकारणार आहे. यासाठी तिलाही उर्दू शिकण्यास सांगण्यात आले आहे. जान्हवी आता उर्दूचे धडे घेत असून या भाषेतील संवादफेकीवर ती बरीच मेहनत घेत आहे. इतकंच नाही तर तिला काही पुस्तकंसुद्धा वाचण्यासाठी देण्यात आली आहेत. 
 
औरंगजेब-द मॅन अँड द मिथ आणि स्टोरीओ दो मोगोर ही बड्या इंग्रजी साहित्यिकांची पुस्तकं ती वाचत आहे. औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारित हा सिनेमा 2020मध्ये प्रदर्शित होणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कादर खान यांचं निधन, अमिताभ यांनी या प्रकारे काढली आठवण