Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कँसरसाठी स्वत:ला जबाबदार समजत होती सोनाली बेंद्रे

sonali bendre
, सोमवार, 4 मार्च 2019 (10:23 IST)
मागच्या वर्षी सोनाली ब्रेंदेला हाय ग्रेड कँसर आहे समजले होते. त्यानंतर जेव्हा तिनी ही बातमी तिच्या चाहत्यांना शेअर केली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. सोनालीने न्यूयॉर्क जाऊन त्याचा उपचार केला आणि नुकतीच ती भारतात परतली आहे.  
 
सोनालीने सांगितले की सुरुवातीत तिला मनोचिकित्सकाची मदत घ्यावी लागली होती. तिने सांगितले की ती स्वत:ला कँसरसाठी जबाबदार ठरवत होती. सोनालीने सांगितले की, 'सर्व लोक म्हणतात तुझी लाइफस्टाइल अशी नव्हती, मग तुला हे कसे झाले ? मला वाटले मी काही चुकीचे केले आहे आणि हे सर्व माझ्यामुळेच झाले.'
 
सोनालीने म्हटले की यानंतर मनोचिकित्सकाकडे गेले आणि त्यांना सांगितले की मला कळत नाही आहे की माझ्यासोबत हे कसे काय होत आहे. तिनी मनोचिकित्सकाला हे म्हटले की, 'मी निगेटिव्ह व्यक्ती नाही आहे. माझे विचार पॉझिटिव्ह आहे. मला काही भ्रम आहे का?'
 
सोनालीने सांगितले की यासाठी मनोचिकित्सकाने जे काही सांगितले ते मला नेहमीसाठी लक्षात राहिले. त्यांनी सांगितले, 'सोनाली, कँसर जेनेटिक्स किंवा वायरसमुळे होतो. जर कँसर विचारांमुळे होत असेल तर मी सर्वात श्रीमंत मनुष्य असतो कारण विचार करणे हा माझा व्यवसाय आहे.' यानंतर सोनालीला जाणवले की जर कोणाला कर्करोग झाला आहे तर याचा अर्थ असा नाही की त्याने काही चुकीचे केले आहे.  
 
सोनाली डिसेंबरामध्ये मुंबई परतली आहे आणि आपले पती व मुलासोबत सुट्या घालवत आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनूने पहिल्यांदा गायिली एकाच सिनेमातील सर्व गाणी