Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनू निगमची लाइव्ह परफॉर्मन्समध्ये तब्बेत बिघडली, सिंगर ने सोशल मीडियावर माहिती दिली

Sonu Nigam Live Performance
, सोमवार, 3 फेब्रुवारी 2025 (18:39 IST)
बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगमला कोणत्याही ओळखीची गरज नाही. गायनाव्यतिरिक्त, गायक त्याच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी देखील ओळखला जातो. अलीकडेच त्यांनी काही बड्या गायकांना पद्मश्री पुरस्कार न मिळाल्याबद्दल एक व्हिडिओ शेअर करून आवाज उठवला. दरम्यान, आता त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. 
 या व्हिडिओमध्ये सोनू निगम यांची पुण्यातील कॉन्सर्टमध्ये लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान  तब्बेत बिघडली. व्हिडिओ मध्ये गायक वेदनेने ओरडताना दिसत आहे. 

सोनू निगम ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाइव्ह कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मध्ये त्यांनी घडलेले सांगितले आहे. ते म्हणतात माझ्या आयुष्यातील सर्वात कठिन दिवस होता.मी गाणे गात असताना नाचत असताना दुखणे सुरु झाले. मी कसेबसे स्वता:ला सावरले.मला लोकांच्या अपेक्षा मोडायच्या नव्हत्या.म्हणून मी कॉन्सर्ट पूर्ण केला.
पण वेदना असहनीय होती. असे वाटत होते की कोणी माझ्या मणक्यात सुई टोचली आहे. 
व्हिडिओच्या खाली गायकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'काल रात्री सरस्वतीजींनी माझा हात धरला.' आता त्याचे चाहते या व्हिडिओवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. तसेच ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Narmada Parikrama नर्मदा परिक्रमा नियम आणि महत्त्व, संपूर्ण माहिती जाणून घ्या