Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

KKR च्या या क्रिकेटरसोबत शाहरुखची मुलगी सुहाना डेट करत आहे

Webdunia
सोमवार, 4 जून 2018 (14:23 IST)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)ची फ्रेंचाइजी टीम कोलकाता नाइट राईडर्स (केकेआर)चे को-ओनर आणि बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना सध्या चर्चेत आहे. सुहानाचे नाव केकेआरच्या एका क्रिकेटरसोबत जोडण्यात येत आहे. असे वृत्त आले आहे की सुहानाला केकेआरचे फलंदाज शुभमन गिलवर क्रश आहे.
 
फॅमिली मॅन म्हणून शाहरुखला ओळखले जाते. आज शाहरुख बॉलीवूडचा बादशहा आहे. पण तो त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबीयांना वेळ देतो. शाहरुखला सुहाना, आर्यन आणि अब्राहम अशी तीन मुले आहेत. त्याची मुलगी सुहाना तर सध्या बॉलीवूडच्या अनेक पार्टीमध्ये, कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्ज करवते. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरदेखील ती खूपच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोव्हर्स आहेत. सुहाना लवकरच बॉलीवूडमध्ये एंट्री देखील करणार असल्याची चर्चा आहे. करण जोहर आणि शाहरुखचे खास मैत्रिपूर्ण संबंध असल्याने करणच्या चित्रपटामधूनच सुहाना बॉलीवूडमध्ये एंट्री करणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
 
सुहाना सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असलेली आपल्याला पाहायला मिळते. सुहाना नुकतीच म्हणजेच २२ मे ला अठरा वर्षांची झाली. सुहानाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिची आई गौरी खान हिने सुहानाचा एक अतिशय ग्लॅमरस फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.
 
आयपीएलमधील कोलकाता नाईट राईडर ही शाहरुख खानची टीम असून आयपीएलच्या सगळ्या मॅचेसना शाहरुख आवर्जून उपस्थित असतो. त्याची मुलगी सुहाना देखील यंदाच्या सगळ्या मॅचेसना उपस्थित होती. सुहाना या सीझनमधील सगळ्या मॅचेसना का उपस्थित होती, यामागे एक खास कारण आहे. केकेआरमधील एका खेळाडूसोबत सुहानाचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. शुभमन गिल असे या क्रिकेटरचे नाव असून या युवा क्रिकेटरसोबत अनेक वेळा सुहाना वेळ व्यतीत करताना दिसत आहे. सुहाना आणि शुभनम यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याचे म्हटले जाते. शुभमन १९ वर्षांखालील भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील त्याच्या कामगिरीमुळे प्रकाशझोतात आला. शुभनमने आजवर खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याची तुलना ही विराट कोहलीसोबत करण्यात येते.
 
क्रशच्या वृत्तानंतरच मीडियामध्ये दोघांच्या अफेयरची चर्चा रंगली आहे. पण अद्याप यावर मौन पाळण्यात आले आहे. केकेआरने या सीझनमध्ये अंडर-19 वर्ल्ड कप विनिंग टीमसाठी खेळाडूंवर फार दाव लावला होता, ज्यात शुभमन देखील एक होता. शुभमनचे प्रदर्शन या सीझनमध्ये फारच छान राहिले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

पुढील लेख
Show comments