कोरोना व्हायरसचा प्रभाव भारतात अधिक आहे वा अमेरिकेत? तर उत्तर सोपं आहे अमेरिका, कारण तेथे संक्रमित लोकांची संख्या अधिक आहे आणि भारताच्या तुलनेत मृतकांची संख्या देखील काहीपटीने जास्त आहे. तरी या सुरक्षेच्या आधारावर कुणीही भारत सोडून अमेरिकेला निघून जाईल तर ही गोष्ट पचवण्यासारखी वाटत नाही.
सनी लिओनी आपल्या तीन मुलं आणि पतीसह भारत सोडून अमेरिकेला निघून गेली. तिने यासाठी मुलांच्या सुरक्षेची काळजी असल्याचे म्हटले. तिने अमेरिका अधिक सुरक्षित असल्याचे म्हटले.
सोशल मीडियावर सनीने लिहिले की “जगातील सर्व आईंना मदर्स डे च्या शुभेच्छा. जेव्हा आपल्या जीवनात मुलं असतात तेव्हा आपले प्राधान्य आणि सुरक्षा बॅक सीटवर जाते. मला आणि पती डेनिएलला संधी मिळाली आहे की आम्ही आपल्या मुलांना त्या ठिकाणी घेऊन जाऊ जे ठिकाण कोरोनाच्या दृष्टीने सर्वात अधिक सुरक्षित आहे. आमच्या घरापासून लांब, लॉस एंजिल्समध्ये आमचं सीक्रेट गार्डन. मला माहीत आहे की माझी आई देखील असाच विचार करत असेल. मिस यू मॉम। हॅपी मदर्स डे।”
यावर प्रश्न उद्भवत आहे की काय भारतावर सनीला विश्वास नाही? हे माहीत असून देखील की अमेरिकेत कोरोनाचा प्रभाव अधिक आहे तिने भारत का सोडलं? काय भारतात होत असलेल्या प्रयत्नांवर सनीला विश्वास नाहीये? तिला अमेरिकेवर अधिक विश्वास आहे?
सनी लिओनीला भारतात एक नवीन ओळख आणि भरुभरुन प्रेम मिळाले आहे. एका पोर्न स्टारच्या रूपात तिने जेव्हा भारतात पाऊल टाकले तेव्हा बिग बॉस शोमध्ये प्रवेश केल्यावर तिला खूप प्रसिद्धी मिळाली.
सनीला वाटत होतं की भारतासारख्या देशात तिला स्वीकार करणार नाही पण उलट तिला चित्रपटांमध्ये काम मिळालं आणि तिने मोठ्या कलाकारांसोबत देखील काम केले. ती टीव्ही शोजमध्ये देखील आली आणि तिने आपलं पक्ष मांडलं.
एक सामान्य भारतीय देखील तिचा फॅन झाला आणि तिचं एक झलक बघण्यासाठी वेडापिसा असायचा. कोणालही सनीच्या भूतकाळाशी काहीही घेणे-देणे नव्हेत आणि सनीला खूप प्रेम मिळालं. ती सर्वात अधिक सर्च होणारी अभिनेत्री बनली. प्रसिद्धीच्या बाबतीत तिने सर्व सुपरस्टार्स, खेळाडू आणि नेत्यांना तिने मागे सोडले.
सनीला खूप पैसा देखील मिळाला परंतू त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे तिला नवीन ओळख सापडली. सर्वांनी तिला खुशी-खुशी स्वीकारलं ते तर मौल्यवान आहेच तरी तिने भारतातून जाण्याचा निर्णय घेतला.
हे ही खरं आहे की ती नेहमीसाठी गेली नाहीये. परिस्थिती सामान्य झाल्यावर ती परतून येईल परंतू तिने भारतावर विश्वास न ठेवणे कुठेतरी मनाला टोचण्यासारखं आहे.