बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आज मोठा दिलासा मिळाला आहे. खरं तर, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने अभिनेत्रीला मिळालेल्या जामिनाला कोर्टात आव्हान दिलं होतं. बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट (एनडीपीएस अॅक्ट) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये दिलेल्या जामिनाला आव्हान देणार नाही, असे केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
एएसजी राजू म्हणाले, "आम्ही मंजूर केलेल्या जामीनाला आव्हान देत नाही, परंतु कृपया कलम 27A च्या अन्वयार्थावर विचार करण्यासाठी खुला ठेवा. आदेशाला उदाहरण बनू देऊ नका." NDPS कायद्याचे कलम 27A बेकायदेशीर तस्करी आणि गुन्हेगारांना आश्रय देण्याशी संबंधित आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त 20 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने ते मान्य करत सरकारचे अपील निकाली काढले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा पूर्वापार विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट केले.
ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर केला. आपल्या आदेशात, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते की ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे देणे याचा अर्थ रिया चक्रवर्ती कोणत्याही अवैध तस्करीमध्ये सामील होती असा होत नाही. अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी एखाद्याला पैसे दिल्याचा अर्थ असा नाही की त्याने त्यांना तसे करण्यास प्रोत्साहित केले, असेही न्यायालयाने म्हटले आहे. एनडीपीएस प्रकरणात रियाला जामीन मिळाला आहे.