Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

movie Chhava
, सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 (13:44 IST)
छावा हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीवर आधारित आहे. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे. विकी कौशल व्यतिरिक्त, यात अक्षय खन्ना, रश्मिका मंदान्ना, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांच्याही भूमिका आहेत. छावा तिच्या विषयामुळे महाराष्ट्रात खूप चांगली कामगिरी करत आहे. 
छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात मुघल शासक औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत कसे मारले हे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे
 
लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि महान मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनावर आधारित आहे. मुघल सम्राट औरंगजेब विरुद्धच्या त्याच्या लढाईचे चित्रण करणारा हा चित्रपट त्याच्या शौर्य आणि दृढनिश्चयाचे दर्शन घडवतो. या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षक मिळाले जिथे छत्रपती संभाजींना नायक म्हणून आदर आणि पूजा केली जाते.
छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असून 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहून भावुक झाले आहे. काही लोक चित्रपटगृहात शिवगर्जना करून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. तर काही जण प्रेक्षक पारंपरिक पेहराव करून चित्रपट बघत आहे. तर काही प्रेक्षक हा चित्रपट बघून रडत आहे. चित्रपटातील विक्की कौशलचे कौतुक सर्वत्र होत आहे. प्रेक्षक लिहितात आम्हाला विक्कीचा अभिनय दिसला नाही तर आम्हाला या मध्ये धर्माचे रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची छवी दिसत आहे. प्रेक्षकांचे डोळे चित्रपट पाहून पाणावत आहे. 
सध्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये हा चिमुकला शिवगर्जना करत रडताना दिसत आहे. त्याला शेजारी बसलेली व्यक्ती धीर देत आहे. या व्हिडिओवर नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार