Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉमेडियन कपिल शर्मा यशाच्या शिखरावर; ओटीटीचा सर्वात महागडा विनोदी कलाकार बनला

kapil sharma
, शनिवार, 7 जून 2025 (08:47 IST)
Comedian Kapil Sharma : कॉमेडियन कपिल शर्मा आज यशाच्या शिखरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी त्याने किती संघर्ष केला हे सर्वांनाच माहिती आहे. आता तो लवकरच नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' घेऊन परतत आहे.

तसेच कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारित होणारा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' त्याच्या तिसऱ्या सीझनसह परतत आहे आणि यावेळी चर्चेचे केंद्र केवळ शोचे पुनरागमनच नाही तर कपिल शर्माचे फी देखील आहे.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा या शोच्या एका एपिसोडसाठी ५ कोटी रुपये घेत आहे. ही फी केवळ कॉमेडी शोच्या जगातच नाही तर भारतीय टीव्ही इतिहासातही सर्वाधिक मानली जाते. शोचे शूटिंग सुरू झाले आहे आणि त्याचा पहिला एपिसोड २१ जून २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये सुपरस्टार सलमान खान दिसू शकतो.

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या स्टारकास्टमध्ये कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, अर्चना पूरण सिंग आणि इतर जुने चेहरे पुनरागमन करत आहे. शोच्या पुनरागमनाबद्दल कपिल शर्मा म्हणाले की, मला पुन्हा माझ्या कुटुंबात परत आल्यासारखे वाटत आहे. त्यांनी असेही सांगितले की ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणे थोडे वेगळे आहे परंतु त्यात अधिक स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता आहे.  
ALSO READ: अभिनेता डिनो मारिओच्या घरावर ईडीचा छापा
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ही ठिकाणे बकरी ईद साजरी करण्यासाठी परिपूर्ण आहे